पुणे शहरात दिवसभरात ३६६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७१ हजार ४१८ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४८२ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३४६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६१ हजार ५५६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १४९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २८० जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३ हजार ८८ वर पोहचली असून पैकी, ८९ हजार ५११ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८५४ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.