नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा हटवणाऱ्या चौघा आरोपींना मंगळवारी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, सध्या रा. बालाजीनगर, मूळ रा. हरीपूर, सांगली), स्वप्नील सूर्यकांत लाळे (वय २४, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), गणेश देवीदास कारले (वय २६, रा. चांदूस, ता. खेड) अशी या आरोपींची नावे आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असणाऱ्या या चौघाजणांनी ३ जानेवारीला संभाजी उद्यानात असलेला गडकरी यांचा पुतळा उखडून मुठा नदीपात्रात फेकून दिला होता. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आगमी महापालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटविल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, या घटनेपूर्वी गडकरींचा पुतळा काढला जावा, यासाठी अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार करून मागणी केली होती. याची दखल महापालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी घेतली नाही. यामुळे कार्यकर्त्यानी पुतळा काढला. गडकरींच्या पुतळया जागी संभाजी महाराजाचा पुतळा बसला पाहिजे. गडकरींच्या पुतळयास आणि तैलचित्रास कायम विरोध राहणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध करताना या घटनेमागील बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा  दिला होता. काही संकुचित विचारसरणीच्या आणि नादान लोकांकडूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना एका जाती-धर्मात अडकिवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरच जातीयवादी राजकारणाची खुमखुमी सुरू आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असेही आवाहन फडणवीस यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सत्तेत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच संभाजी महाराजही सर्वाच्या मनात आहेत. संभाजी महाराजांचे जीवन हे सगळ्यांना प्रेरणाच देते. दुर्दैवाने त्यांच्या नावाने काही संकुचित विचारसरणीचे लोक त्यांना ठरावीक जाती-पातीत अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खुमखुमी येऊन काही नादान लोकांनी निंदनीय प्रकारही केले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या लोकांना कळालेच नाहीत. झालेल्या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी