पाच प्रभागांतील निम्म्याहून अधिक नागरिकांना करोना होऊन गेल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून उघड

पुणे : करोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा जिवाचे रान करत असताना सर्वेक्षण झालेल्या पाच प्रभागांतील ५१.५ टक्के  नागरिकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आणि त्यांना तो कळलाही नाही, असे स्पष्ट झाले आहे. येरवडा, कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहिया नगर-कासेवाडी आणि पर्वती-नवी पेठ या प्रभागांतील निरोगी नागरिकांमध्ये हे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी कसबा पेठ-सोमवार पेठेतील ३६.१ टक्के  तर लोहिया नगर-कासेवाडीतील ६५.४ टक्के  नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंड आढळून आले आहेत.

पुणे महापालिका, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ, इंडियन इन्स्टिटय़ूट फॉर सायन्स, एज्युके शन अ‍ॅण्ड रिसर्च (आयसर) आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट यांच्या पुढाकारातून हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाचा अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयसरचे डॉ. एल. एस. शशिधरा यांनी सोमवारी प्रसिद्ध के ला. पाच प्रभागांतील ५१.५ टक्के  लोकसंख्येमध्ये करोना प्रतिपिंड आढळले असले, तरी त्याचा अर्थ नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे किं वा नाही हे स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले आहे. २० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत, १८ वर्षांवरील वयाच्या निरोगी, कोणतेही आजार नसलेल्या नागरिकांच्या नमुन्यांचे संकलन करण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणाला पर्सिस्टंट फाउंडेशनने अर्थसाहाय्य के ले आहे.

सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?

साथीच्या रोगांच्या काळात प्रत्यक्ष आढळलेल्या रुग्णांव्यतिरिक्त लोकसंख्येतील किती टक्के  नागरिकांना साथरोग होऊन गेला हे पाहण्यासाठी सिरो सर्वेक्षण के ले जाते. निरोगी नागरिकांची प्रतिपिंड चाचणी करून त्याद्वारे त्यांच्यामध्ये करोनाची प्रतिपिंड आहेत का हे तपासले जाते. अशी प्रतिपिंड रोगातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात, त्यामुळे किती टक्के  नागरिकांमध्ये प्रतिपिंड आढळले यावरून किती लोकसंख्येला संसर्ग होऊन गेला हे तपासणे शक्य होते.

रहिवास आणि संसर्ग

झोपडपट्टीतील ६२ टक्के  लोकसंख्येमध्ये करोना प्रतिपिंड आढळले आहेत. भाडय़ाने राहणाऱ्यांच्या वसाहतींमध्ये हे प्रमाण ५६.२ टक्के  आहे. गृहनिर्माण संस्थेतील ३३.२ टक्के  लोकसंख्येत तर बंगल्यांमध्ये राहणाऱ्या ४३.९ टक्के  लोकसंख्येत प्रतिपिंड आढळले आहेत. १५० चौ. फु टांपेक्षा कमी जागेत राहणाऱ्या ५९.६ टक्के  लोकसंख्येत करोना प्रतिपिंड आढळले आहेत. १५१-३०० चौ. फु टांच्या जागेत राहणाऱ्या ५८.६ टक्के  लोकसंख्येत संसर्ग होऊन गेल्याचे दिसले आहे. ३०१-५०० चौ. फु टांमध्ये राहणाऱ्या ४८.५ टक्के  तर ५०० चौ. फु टांपेक्षा अधिक जागेत राहणाऱ्या ३४.६ टक्के  लोकसंख्येत करोना प्रतिपिंड आहेत.

प्रभाग व किती टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंड

’ येरवडा – ५६.६ टक्के

’ कसबा पेठ-सोमवार पेठ – ३६.१ टक्के

’ रास्ता पेठ-रविवार पेठ – ४५.७ टक्के

’ लोहिया नगर-कासेवाडी – ६५.४ टक्के

’ पर्वती-नवी पेठ – ५६.७ टक्के

स्वच्छतागृहाच्या वापरानुसार

सामायिक स्वच्छतागृह वापरणाऱ्या आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा असलेल्या लोकसंख्येतील संसर्गामध्ये मोठा फरक आढळून आला आहे. सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करणाऱ्या लोकसंख्येतील ६२.३ टक्के  लोकसंख्येला संसर्ग होऊन गेला आहे, मात्र स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय असलेल्या लोकसंख्येत हे प्रमाण ४५.३ टक्के  एवढे आहे.

या नागरिकांमध्ये संसर्ग कमी

सिरो सर्वेक्षणासाठी १८-३०, ३१-५०, ५१-६५ व ६६ वर्षांवरील नागरिकांचा समावेश. त्यांपैकी ६६ वर्षांवरील लोकसंख्येत इतर वयोगटांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच ३९.८ टक्के  एवढय़ाच लोकसंख्येला संसर्ग होऊन गेल्याचे दिसून आले आहे. ५१-६५ वर्ष वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५४.८ टक्के  आहे. १८-३० वयोगटातील ५२.५ टक्के  तर ३१-५० वर्ष वयोगटातील लोकसंख्येत ५२.१ टक्के  लोकसंख्येला संसर्ग होऊन गेल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.