पुण्यातील हांडेवाडी भागातील एका महिलेला तुमच्या घरात दोष आहे व तो घालवण्यासाठी विधी करावा लागणार असल्याचे सांगुन, या कामासाठी सव्वा वर्षात तब्बल ९ लाख ९७ हजार रूपयांची फसवणुक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी भागातील एका महिलेस एका अनोळखी व्यक्तीने तुमच्या घरात दोष असल्याचे सांगितले. तसेच हा दोष काढावा लागणार असून त्या महिलेच्या घराची पाहणी केली. यावेळी त्याने स्वयंपाक घरात जाऊन त्या महिलेला काळी बाहुली दाखवून भीती देखील दाखवली. शिवाय तुम्हाला लवकरात लवकर दोष बाहेर काढण्यासाठी एक विधी करावा लागणार असल्याचे म्हणत, या करता एका उंटाचा बळी द्यावा लागेल, असे सांगुन त्याने या महिलेची आजपर्यंत तब्बल ९ लाख ९७ हजार रूपयांची फसवणुक केली आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.