News Flash

पुणे – मुलांना मारून टाकण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

संग्रहित छायाचित्र

मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी विपुल कासार (३९) याला अटक केली आहे. आरोपीने पीडित महिलेने व्हॉट्सअॅपला डीपी म्हणून ठेवलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसंच दोन्ही मुलांना जीवे ठार मारु असंही धमकावण्यात आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विपुल याने पीडित महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवला होता. त्यावर फोन करून मला तू खूप आवडतेस, माझ्यासोबत फोनद्वारे अथवा प्रत्येक्ष वेळ मिळेल तेव्हा बोलत, भेटत जा असं म्हणत असे. घाबरलेल्या पीडित महिलेने आपल्या पतीला यासंबंधी सांगितलं होतं. यानंतर पतीने आरोपी विपुलची भेट घेत त्याला समजावून सांगितलं होतं.

त्यानंतर काही वेळ आरोपी शांत झाला होता. पण काही महिन्यांनी पुन्हा त्याने महिलेशी संपर्क साधला. यावेळी त्याने महिलेला तुझे व्हॉट्सअॅप डीपीचे फोटो संग्रहित केले असून तू माझ्याशी बोलली नाहीस तर सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करु अशी धमकी दिली. यावेळी त्याने महिलेकडे एक मोबाईल आणि सिमकार्ड देत फोन केला नाही तर दोन्ही मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली.

यामुळे घाबरलेली पीडित महिला आरोपीला फोन करत असे. पती बाहेरगावी जाताच तो महिलेच्या घरी येऊन बळजबरीने शारिरीक संबंध ठेवत असे. आपल्यावर अनेकदा शारिरीक अत्याचार करण्यात आल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. यानंतर कारवाई करत चिखली पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 6:21 pm

Web Title: a woman raped in pune threaten to kill children sgy 87
Next Stories
1 डेक्कन क्वीनमध्ये प्रवाशाला देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये अळ्या, कारवाईची मागणी
2 पुणे : आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
3 मांडवांनी रस्ते व्यापले
Just Now!
X