News Flash

मामाच्या भेटीला निघालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

पुणे स्टेशनजवळ आरटीओ ऑफिससमोर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने घडला अपघात

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारी सात वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत दुचाकीवरून मामाला भेटण्यासाठी जात असताना. पुणे स्टेशनजवळ असलेल्या आरटीओ ऑफिससमोर टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने घडलेल्या अपघातामध्ये त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

श्री दत्तात्रय थोरात (वय -७) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. मनीषा दत्तात्रय थोरात (वय ३८) रा. कोंढवा असे आईचे नाव आहे. आरोपी टँकर चालक राम बाबू खाडे यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील शिवनेरी नगर येथे  मनीषा दत्तात्रय थोरात या पती आणि मुलांसोबत राहतात. तर मनीषा या भावाला भेटण्यासाठी मोपेडवरून दुपारच्या सुमारास चाकणकडे जाण्यास निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत सात वर्षाची श्री ही चिमुकली ही देखील होती. मनीषा यांची दुचाकी पुणे स्टेशन जवळ असलेल्या आरटीओ ऑफिस समोरील पेट्रोल पंपापासून संगमवाडीकडे जात होती. तेवढय़ात पाठी मागून त्यांच्या गाडीला टँकरने जोरात धडक दिली. त्यामध्ये मनीषा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर सात वर्षाच्या श्रीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक राम बाबू खाडे याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास करण्यात येत असल्याचे बंडगार्डन पोलिसकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 9:08 pm

Web Title: accidental death of a seven year old girl who went to visit her uncle msr 87 svk 88
Next Stories
1 गुंड गजा मारणे सातारा पोलिसांकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
2 रवींद्र बऱ्हाटे टोळीवर पुन्हा ‘मोक्का’ कारवाई; मुख्य सूत्रधार बऱ्हाटे फरार
3 दहावी-बारावी परीक्षा नियोजनासाठी समिती
Just Now!
X