पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष लक्ष्मण घाडगे-पाटील यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोप निश्चित करण्यात आले. त्यांच्यावर कट रचणे, खून करणे, पुरावा नष्ट करणे या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पाटील यांच्या अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून इंद्रजित वर्मा (वय १८) या तरूणाचा २ जुलै २००७ रोजी खून झाला होता. याप्रकरणी घाडगे पाटील यांच्यासह सात जणांस पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या खटल्यातून घाडगे पाटलांना सत्र न्यायालयाने वगळले होते. या निर्णयाच्या विरोधात इंद्रजितची आई अनुराधा वर्मा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत घाडगेपाटलांना या खटल्यात सहआरोपी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने पाटील यांचे अपील फेटाळून लावले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयात आज आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यांमध्ये सहा महिन्यांपूर्वी इतर सहा आरोपींच्या विरुद्ध आरोपनिश्चित करण्यात आले आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील चंद्रकिरण साळवी हे काम पाहात आहेत.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Sanjay Singh accused of making offensive remarks about Prime Minister Modi educational qualifications
संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश