03 March 2021

News Flash

येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी; एकजण जखमी

अगोदर बाचाबाची नंतर तुफान हाणामारी

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील येरवडा कारागृहात दोन कैद्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असुन, या घटनेत एक कैदी जखमी झाला आहे.
येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील एका खोलीत खुन प्रकरणातील शाहरूख शेख आणि तुषार हंबीर हे दोघेही आरोपी होते. या दोघांमध्ये आज सकाळच्या सुमारास एका विषयावरून बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली.

यामध्ये शाहरुख शेख याने केलेल्या मारहाणीत तुषार हंबीर हा गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच कोणत्या कारणावरून वाद झाला. याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 2:01 pm

Web Title: action between two prisoners in yerawada jail one injured msr87
Next Stories
1 पुणे भिंत दुर्घटना: वाचवा वाचवा! एवढंच ऐकू येतंय; बचावलेल्या महिलेने सांगितला अनुभव
2 सिंहगड कॅम्पस दुर्घटनेवरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला जाब
3 पुणे भिंत दुर्घटना: एका तरूणामुळे वाचले तिघांचे प्राण
Just Now!
X