रात्रीच्या कालावधीत जादा गाडय़ांचेही नियोजन

गणेशोत्सवाच्या कालावधीत रात्री दहानंतर पीएमपीची दैनंदिन बससेवा बंद राहणार असून रात्री दहानंतर विशेष यात्रा गाडय़ा शहराच्या विविध भागात धावणार आहेत. त्याबाबतची सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत पीएमपी प्रशासनाकडून रात्रीच्या कालावधीत जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा गाडय़ा रात्री दहा वाजल्यानंतर रस्त्यांवर धावणार असून ६४९ जादा गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवातील वाहतूक बदल लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने दोन वर्तुळाकार मार्ग तयार करण्यात आले आहेत.

Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात गणपती मंडळांनी केलेली विद्युत रोषणाई, सजावट आणि देखावे पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नजीकच्या उपनगरातून आणि बाहेरगावाहून येणाऱ्यांची गर्दी होत असते.

त्यामुळे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पीएमपीकडून पाच सप्टेंबपर्यंत रात्रीच्या कालावधीत जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. या बससेवेसाठी प्रवाशांना नियमित तिकिटांपेक्षा पाच रुपये अधिक मोजावे लागणार असून रात्री बारा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचे पास चालणार नाहीत, असे पीएमपीकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे दैनंदिन संचलनामध्ये असलेला शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावर संचलनात असलेल्या बस मार्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. मार्गामध्ये बदल झाला तरी तिकीट दर नेहमीचेच राहणार आहेत.

रात्रीच्या वेळेतील या जादा गाडय़ा स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन, हडपसर-गाडीतळ, महात्मा गांधी बसस्थानक, डेक्कन जिमखाना, निगडी बसस्थानक, भोसरी आणि चिंचवड गांव बसस्थानातून सुटणार आहेत. कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव, वडगाव धायरी, सिंहगड, खानापूर, हडपसर, कोंढवा, लोहगाव, वडगावशेरी, केशवनगर, भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, तळेगाव-दाभाडे, कर्वेनगर, खडकी बाजार, माळवाडी, कोथरूड डेपो, धानोरी, विद्यानगर, सासवड, उरूळी कांचन, मांजरी-थेऊर, वडकी गाव, फुरसुंगी अशा विविध भागात रात्रीच्या वेळेत या गाडय़ा धावणार आहेत.

दरम्यान, स्वारगेट-डेक्कन-महापालिका-शिवाजीनगर-पुणे स्टेशन-पुलगेट-स्वारगेट हा पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडसाठी भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी असे पिंपरी-चिंचवडमध्ये वर्तुळाकार मार्ग या कालावधीत सुरू करण्यात येणार आहेत. या मार्गासाठी प्रती प्रवासी दहा रुपये तिकीट आकारण्यात येणार असून ३१ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.