आषाढी वारी शासनाच्या नियमानुसारच; विभागीय आयुक्तांचे आदेश

पुणे : आषाढी वारीबाबत मानाच्या दहा पालखी देवस्थानांचे विश्वस्त आणि वारकरी संघटनांनी केलेल्या विविध मागण्या प्रशासनाने अमान्य केल्या आहेत. त्यामुळे करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने निश्चित के लेल्या नियमानुसारच  वारी होणार आहे.

याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रसृत के ला आहे.  मानाच्या पालख्यांचे विश्वस्त  आणि वारकरी प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रस्थान सोहळ्यास प्रत्येक दिंडीतील प्रतिनिधीला उपस्थित राहण्यास मुभा द्यावी, प्रस्थान सोहळ्यात अश्वांना परवानगी द्यावी, शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक लोकांना वारीत सहभागी देण्यास परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.

मात्र, करोनाची संभाव्य तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने चर्चा करून निर्णय घेतला असल्याने विभागीय आयुक्त राव यांनी शासनाच्या अधीन राहूनच लेखी आदेश प्रसृत के ले आहेत.

आदेशात काय?

’दहा मानाच्या पालख्यांनाच परवानगी, अन्य पालख्या किं वा दिंडय़ांना परवानगी नाही.

’आळंदी आणि देहू येथील प्रस्थान सोहळ्यास प्रत्येकी १००, तर अन्य आठ पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यास ५० जणांना मुभा.

’प्रस्थान सोहळ्यापूर्वी दोन दिवस आधी सहभागी होणाऱ्या सर्वाच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा नकारात्मक अहवाल बंधनकारक.

’पादुकांसोबत विशेष वाहनाद्वारे प्रतिवाहन २० याप्रमाणे दोन वाहनांमधून ४० जणांनाच परवानगी.

’पादुका वाखरी येथे पोहोचल्यानंतर येथून पंढरपूपर्यंतचे अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याला मान्यता.