News Flash

धक्कादायक! पुण्यात एअर होस्टेसवर बलात्कार

पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यात एका एअर होस्टेसवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीला बळजबरीने मद्य पाजण्यात आले. त्यानंतर तिला बेदम मारहाणही करण्यात आली. पीडित मुलीवर सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २७ डिसेंबरला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं पिंपरी पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. सदर एअरहोस्टेस तरुणी आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाची ओळख २६ डिसेंबरला एका डेटिंग अॅपवरुन झाली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथे २६ वर्षीय एअरहोस्टेसला बेदम मारहाण करून, बळजबरीने मद्य पाजून बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून २८ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित सीताराम वाघ (वय- २८) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ही घटना २६ डिसेंबर रोजी घडली असून २७ डिसेंबर २०२० ला वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एअरहोस्टेस असून आरोपी आणि तिची ओळख डेटिंग (टिंडर) अॅपवरून झाली. अवघ्या एका दिवसाच्या ओळखीवर दोघे ही हिंजवडीत एका हॉटेलमध्ये भेटले. तिथे तरुणीला बळजबरी मद्य पाजले असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर, तरुणीने आरोपीला घरी सोडण्यास सांगितले, मात्र आरोपीने तरुणीची दिशाभूल करून तिला स्वतः च्या घरी नेले. तिथे त्यांच्यात वाद झाले, आरोपी अभिजितने तरुणीवर बळजबरी केली. मोठ्याने आरडाओरडा झाला. अभिजित ने तरुणीला बूट, लाथा, बुक्क्यांनी डोळा, कान, तोंडावर बेदम मारहाण करत बलात्कार केला.

आरडाओरडा येकून आरोपीचे अभिजितचे वडील घाबरले त्यांनी वाकड पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. वाकड पोलिसांनी तातडीने  घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं आणि पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून तो विवाहित आहे. त्याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेलेली आहे. तर वडील मुख्याध्यापक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 6:29 pm

Web Title: airhostess girl raped in pune hospitalized in sasson scj 81 kjp 91
Next Stories
1 पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास सव्वाशे वर्षे पूर्ण
2 कडाक्याच्या थंडीनंतर पुन्हा तापमानवाढ
3 फेसबुकवरून विवाहित महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तणावात येऊन तरुणाची आत्महत्या
Just Now!
X