26 February 2021

News Flash

वातावरणातील बदलांमुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना रुग्णसंख्या वाढत आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

 

करोना वाढीच्या पार्श्वभूमी वर खबरदारीचे आवाहन

पुणे : एका बाजूला करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वातावरणातही सतत दिसणारे चढ-उतार चिंता वाढवणारे ठरत आहेत. रात्री थंडी, दिवसभर गरम होणे, ढगाळ हवामान आणि कधीही हजेरी लावणारा पाऊस यांमुळे श्वसनविकारांचे रुग्ण वाढत आहेत. करोना महामारीच्या काळात ही रुग्णवाढ धोक्याची ठरत आहे.

पुणे महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच वेळी वातावरणही  बदलत असल्यामुळे श्वसनविकारांचे रुग्णही वाढत आहेत. ही वाढ चिंताजनक आहे. कारण दिवसभरात थंडी, उकाडा, ढगाळ हवामान, पाऊस असे बदल शरीरासाठी हानीकारक आहेत. ताप, सर्दी, खोकला यांमध्ये वाढ होण्यास असे वातावरण कारणीभूत ठरते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. त्याच बरोबर मधल्या काळात करोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मुखपट्टी, हात धुणे, अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपायांकडेही नागरिकांनी दुर्लक्ष के ले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास करोना चाचणी होणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. वावरे यांनी स्पष्ट के ले.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, एकाच दिवसात सर्व प्रकारचे हवामान हे आजारांना निमंत्रण देते. सध्या शहरात रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा आहे. दिवसभर उकाडा आहे. ढगाळ हवामान आणि पाऊसही आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांच्या वाढीला पोषक वातावरण आहे. त्यातच करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कोणत्याही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी वावरू नये. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही हे पाहावे. त्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा. हात धुतले नसल्यास चेहरा, नाक, तोंड यांना स्पर्श करू नका. वैयक्तिक स्वच्छता राखण्यावर भर द्या, असे आवाहन डॉ. भोंडवे यांनी के ले आहे.

अशी काळजी घ्या…

  •   मुखपट्टी वापरा.
  •  गर्दीत जाणे टाळा.
  •   वैयक्तिक स्वच्छता राखा.
  • विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
  •  डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
  • पूर्ण विश्रांती घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 1:40 am

Web Title: an increase in respiratory disorders due to climate change akp 94
Next Stories
1 स्वागत करणं भोवलं; गुंड मारणेच्या ताफ्यातील १७ जणांना बेड्या; २०० जणांचा शोध सुरू
2 पुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू! २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद
3 उपमुख्यमंत्री अजित पवार तासभर आधीच बैठकीच्या ठिकाणी; अधिकाऱ्यांची झाली धावपळ
Just Now!
X