‘हंस ‘ , ‘ मोहिनी ‘ व ‘ नवल ‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार( २८ ऑगस्ट) रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

साधारण महिनाभरापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या . त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते.

judge dog stolen
न्यायाधीशांच्या घरातून श्वानाची चोरी झाल्याचा आरोप; तब्बल २४ जणांवर गुन्हा दाखल; कुठे घडला प्रकार?
Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
case of the missing keys Puri Jagannath temple Naveen Patnaik Odisha
‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?
Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
thief revealed in front of vasai police committed 65 house burglaries
वसई : वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर पोलिसांच्या जाळ्यात
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

त्यांच्या पश्चात् त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या ), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी आहेत.

रूग्णालयात जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बव्हंशी पूर्ण केले होते. ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे ह्या वर्षीचे दिवाळी अंकसुद्धा वाचकांपर्यंत पोहचणार आहेत, अशी ग्वाही अभिराम अंतरकर ह्यांनी दिली.

आनंद अंतरकरांच्या निधनाने उत्तम सजावट आणि अनुभवी तसेच नवोदित लेखकांच्या कसदार साहित्याने नटलेल्या मुद्रित मराठी नियतकालिकांचे एक अनोखे पर्व संपुष्टात आले आहे .