डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेत ८ कामगार ठार झाले होते. तसेच ६५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच त्या कंपनीच्या शेजारील काही कंपन्यांचंही मोठ्या प्रणाणात नुकसान झालं होतं. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला होता. आता या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक केली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर कंपनीच्या मालक मालती मेहता या नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाशिक पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सयुक्त कारवाई करत कारवाई केली. दरम्यान, त्यांना ठाणे पोलिसांकडे सोपवण्यात येणार असून घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

In Nagpur father shot his son in leg with his licensed gun
बापाने मुलावर गोळी झाडली, तरीही न्यायालयाकडून हत्येचा गुन्हा रद्द… कारण,…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
uke send bomb threats email regarding Jagdish Uikes terrorism book publication
विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक
12 civilians injured in grenade attack in Srinagar
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १२ जखमी; जखमींमध्ये महिला व दुकानदारांचा समावेश
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Srinagar Sunday Market Terrorists Attack
Srinagar Attack : श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, सहा जण जखमी
Lawrence Bishnoi Gang
लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या शत्रू टोळीचा उद्योगपतीच्या घरावर गोळीबार; दोघांना अटक

हेही वाचा : Dombivli MIDC Blast: बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची पालिका रुग्णालय, कंपनी परिसरात शोधाशोध

नेमकी काय घटना घडली होती?

डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील एका केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झाला होता. यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच जवळपास ६५ जण जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. तसेच जखमी असलेल्या व्यक्तींचा खर्चही सरकारद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

अतिधोकादायक कंपन्या बंद करणार

डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्यात येतील. केमिकल कंपन्या शहरा बाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. डोंबिवलीतील एमआयडीसीतील स्फोट प्रकरणानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळाला भेट दिली होती.

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

डोंबिवलीतील एमआयडीसी प्रकरणातील आरोपींना अटकेबाबत काल रात्रीपासून आमची टीम पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती. त्यानंतर आज आम्ही या स्फोट प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं आहे”, अशी माहिती नाशिक येथील एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.