News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये २० कोटींचे ड्रग्ज जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे 20 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्स (एम.डी) पोलिसांनी पाच व्यक्तींकडून जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. अद्याप ते कोणाला अंमली पदार्थ विकण्यासाठी आले होते हे स्पष्ट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शाकिर जीनेडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी चेतन फक्कड दंडवते वय- 28, आनंदगीर मधूगिर गोसावी वय- 25, अक्षय शिवाजी काळे वय- 25, संजीवकुमार बन्सी राऊत वय-44 रा. झारखंड, तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम वय- 31 रा.बिहार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे काही व्यक्ती मेफेड्रोन ड्रग्स (एम.डी) हे बाळगून असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचारी यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून आरोपींना मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांचे ड्रग्स, 5 लाखांची मोटार तसेच 23 हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण 20 कोटी 5 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या पैकी दोन आरोपी हे बिहार आणि झारखंड येथील आहेत त्यामुळे ड्रग्स कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते का? याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करत आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 11:05 am

Web Title: anti drug squad pimpri chinchawad five arrest nck 90 kjp 91
Next Stories
1 सीमाभिंती कागदोपत्री
2 ऑनलाइन शिक्षणाचा शिक्षकांवर ताण!
3 भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचे निधन
Just Now!
X