05 August 2020

News Flash

पुण्याच्या रस्त्यावरून धावतेय ‘बॅटमॅन’च्या ‘बॅटमोबाईल’सदृश्य कार

‘बॅटमॅन’ या हॉलिवूडपटातील बॅटमॅनची ‘सुपर कार’ ही अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे. अशीच एक ‘बॅटमोबाईल’ सदृश्य कार पुण्यातील रस्त्यावरून धावताना दिसत असून, अनेकांचे लक्ष वेधून घेत

| July 3, 2015 06:13 am

batmobile-pune-01‘बॅटमॅन’ या हॉलिवूडपटातील बॅटमॅनची ‘सुपर कार’ ही अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे. अशीच एक ‘बॅटमोबाईल’ सदृश्य कार पुण्यातील रस्त्यावरून धावताना दिसत असून, अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. वर्दळीच्या ठिकाणी धावणारी ही गाडी पाहताच स्मार्ट फोनमधील कॅमेरे सरसावत गाडीची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पुणेकर एकच झुंबड करताना दिसताहेत. ‘बॅटमोबाईल’ची प्रतिकृती असलेली ही गाडी सोशल मीडियावरदेखील अवतरली आहे. जगभरात अनेक ठिकाणी ‘बॅटमोबाईल’ सदृश्य कार रस्त्यावरून धावताना पाहाण्यात आल्या असल्या, तरी भारतातील रस्त्यावरून ती पहिल्यांदाच धावताना दिसत आहे. बॅटमॅनच्या पोशाखातील व्यक्ती ही गाडी चालवत असून, ही व्यक्ती कोण आहे ते अद्याप कळू शकलेले नाही. पुणेकरांमध्येदेखील चालकाविषयी कुतुहल वाढत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2015 6:13 am

Web Title: batman fans head to pune now heres why
Next Stories
1 प्रवास स्वस्त आणि पर्यावरणपूरक करणारे अ‍ॅप!
2 .. अखेर येणार अविश्वास ठराव
3 दातांचे ‘रुट कॅनॉल’ करताना बालिकेचा मृत्यू
Just Now!
X