‘आरएफआयडी’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय

प्राच्यविद्या क्षेत्रात जगभरात नावाजल्या गेलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांना आता अत्याधुनिक प्रणालीचा आधार लाभणार आहे. संस्थेच्या डॉ. रा. ना. दांडेकर ग्रंथालयातील अनमोल ठेवा असलेल्या पुस्तकांसाठी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस’चा (आरएफआयडी) वापर करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून त्यामुळे पुस्तके गहाळ होणे किंवा पुस्तकांची चोरी अशा प्रकारांना आळा बसणार आहे.

शताब्दी वर्ष साजरे केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या ग्रंथालयामध्ये वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, आयुर्वेद यांसह विविध विषयांवरील सुमारे एक लाख ३० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. अर्धशतकाहून अधिककाळ संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा समर्थपणे सांभाळून संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर घालणारे ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. ना. दांडेकर यांचे नाव ग्रंथालयाला देण्यात आले आहे. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील अमूल्य ग्रंथांची भर पडेल याची जाणीवपूर्वक दक्षता दांडेकर यांनी घेतली होती. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरील अनमोल ज्ञानाचा साठा असलेल्या या ग्रंथालयातील पुस्तकांना सातत्याने मागणी असते. हा अनमोल ठेवा सुरक्षितपणे जतन करण्याच्या उद्देशातून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर आणि दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम पाहणारे डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.

परदेशातील ग्रंथालयांमध्ये ‘आरएफआयडी’ ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करुन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन केले जावे, या साठी हा निर्णय घेतला असल्याचे बहुलकर यांनी सांगितले. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असून ग्रंथालयातील सर्वच पुस्तकांसाठी ही प्रणाली उपयोगात आणावी की टप्प्याटप्प्याने ही प्रणाली कार्यान्वित करावी हे लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आरएफआयडी’ प्रणालीमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे डॉ. वैशंपायन यांनी सांगितले. या प्रणालीमुळे पुस्तक गहाळ होणे किंवा चोरीला जाणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. या प्रणालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. वाचकांना घरबसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएस’द्वारे कळविण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने ही प्रणाली कार्यान्वित करावी हे लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आरएफआयडी’ प्रणालीमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे डॉ. वैशंपायन यांनी सांगितले.

या प्रणालीमुळे पुस्तक गहाळ होणे किंवा चोरीला जाणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. या प्रणालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. वाचकांना घरबसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे.

त्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएस’द्वारे कळविण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.