26 September 2020

News Flash

कात्रजमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू

पुण्यातील कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ गुरुवारी रात्री रस्त्यावर आलेल्या बिबट्याचा चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज नवीन बोगद्याजवळ एक बिबट्या मृत अवस्थेत असल्याचं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी फोन करुन सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तर साधारण एक वर्षाच्या बिबच्या मृत अवस्थेत पडला होता. त्या बिबट्याचा तोंडाला चार चाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मार लागला. यामध्ये त्या बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनाही देण्यात आली. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी येऊन त्या अधिकार्‍यांनी देखील पाहणी केली आणि बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन गेले. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे आंबेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी दिली.

कात्रज बोगद्याजवळ असलेल्या दाट झाडीमधून बिबट्या आला आसावा. तसेच जंगलात भक्षक नसल्यामुळे बिबट्या रस्त्यावर आला असेल. त्याचवेळी भरघाव वेगानं येणाऱ्या चारचाकी वाहनाची धडक बसून जाग्यावर मृत्यू झाला असेल, अशी माहिती मधुरा कोराणे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:41 pm

Web Title: bibtya dead katraj pune nck 90 svk 88
Next Stories
1 शहरात संततधार, धरणक्षेत्रात मुसळधार
2 कचरा वर्गीकरण न केल्यास दंड
3 अपात्र ठेके दाराला आंबिल ओढय़ाचे काम
Just Now!
X