News Flash

आदेश धुडकावत पुण्यात फलकबाजी

अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकांत

अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकांत

पुणे : वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नये, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला असला तरी तो धुडकावत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती के ल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे भाजपकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधी करोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी के ले आहे.

दोन्ही नेत्यांनी हे आदेश दिल्यानंतरही शहरात जागोजागी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे आदेश धुडकाविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रमुख चौकात, रस्त्यांवर फलक उभारून आपापल्या नेत्यांनी शहराचा विकास के ल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या शुभेच्छा फलकांवर महापालिके कडून कारवाई होणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 3:35 am

Web Title: birthday wish hoarding of ajit pawar and devendra fadnavis in pune zws 70
Next Stories
1 डिजिटल मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात मुंबई उपनगर आघाडीवर
2 समावेश कागदोपत्रीच
3 पिंपरी पालिकेची संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात यंत्रणा सज्ज
Just Now!
X