News Flash

भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे पद रद्द

पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर किरण जठार या विजयी झाल्या होत्या.

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे पद बुधवारी रद्द करण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तसे आदेश काढले आहेत. ही माहिती राज्य निवडणूक आयोगाला देण्याची कार्यवाही पालिकेकडून  सुरू करण्यात आली.

पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर किरण जठार या विजयी झाल्या होत्या. कळस-धानोरी या प्रभाग क्रमांक एक मधील अ गटातील अनुसूचित जाती या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाकडून जातीचा दाखला मिळविला होता. मात्र त्यावर हुलगेश चलवादी, दिलीप ओरपे आणि रेणुका चलवादी यांनी आक्षेप घेत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जठार यांनी जातीचा दाखला प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव निवडणूक शाखेकडून तयार करण्यात आला होता. प्रस्तावावर आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी स्वाक्षरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:16 am

Web Title: bjp corporator kiran jathar disqualified for submitting fake caste certificate
Next Stories
1  ‘बेटी बचाओ’ची माहिती आफ्रिकी देश घेणार
2 वारजे भागात पीएमपीच्या धावत्या गाडीला आग
3 सेवाध्यास : अवयवदानजागृती
Just Now!
X