महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अपेक्षित वर्चस्व राहिले. पंधरा प्रभाग समित्यांपैकी  ११ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या जागा भाजपला मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला ३ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.

महापालिके च्या पंधरा प्रभाग समितीपदासाठी शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे महापालिके त स्पष्ट बहुमत असल्यामुळे पंधरा जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपला मिळणार, हे स्पष्ट होते. पंधरा पैकी पाच प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालया या पाच प्रभाग समिती अध्यक्षपदाचा समावेश होता. त्यानंतर उर्वरित दहा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

निवड झालेले अध्यक्ष पुढीलप्रमाणे

* औंध-बाणेर- अर्चना मुसळे (भाजप)

* शिवाजीनगर-घोले रस्ता- सोनाली लांडगे (भाजप)

* सिंहगड रस्ता – अश्विनी पोकळे (भाजप)

* वानवडी-रामटेकडी- हमिदा सुंडके  (राष्ट्रवादी काँग्रेस)

* कोंढवा-येवलेवाडी- राणी भोसले (भाजप)

* कसबा-विश्रामबाग- योगेश समेळ (भाजप)

* बिबवेवाडी- राजश्री शिळीमकर (भाजप)

* येरवडा- ऐश्वर्या जाधव (भाजप)

* कोथरूड- हर्षांली माथवड (भाजप)

* नगर रस्ता- संदीप जऱ्हाड (भाजप)

* ढोले-पाटील- चाँदबी नदाफ (काँग्रेस)

* धनकवडी-सहकारनगर- स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

* वारजे-कर्वेनगर- राजेश बराटे (भाजप)

* हडपसर-मुंढवा- गणेश ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

* भवानी पेठ- विजयालक्ष्मी हरिहर (भाजप)