News Flash

“उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

महाविकास आघाडी सरकारने सातत्याने वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. या सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे. कारण हे ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा घणाघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील शुक्रवारी भोसरी (पुणे) येथे आयोजित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

“दादा, तुम्ही लस केव्हा घेणार?”; अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

“नवीन सरकारमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने केली गेली पाहिजेत. सध्या राज्याच्या वसतीगृहातील अवस्था भीषण आहे. डी.बी.टी.च्या माध्यमातून वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले जातात, त्यातही गोंधळ सुरू आहे. काहींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्यांचा लाभ मिळवला आहे. पण सरकारला याचा काहीही फरक पडत नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे अशा सरकारला जागं करण्यासाठी जनतेचे प्रश्न शोधून त्यावर आंदोलन उभारुन सरकारचं लक्ष वेधले पाहिजे”, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं रोखठोक मत, म्हणाले…

“राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वनवासी समाजाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने २५ हजार वनवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांची सर्व फी आपण भरली. त्यासोबतच वनपट्टे वनवासी बांधवांना मिळवून दिले. त्यासाठीचा जो कायदा होता, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व कामांची माहिती कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवली पाहिजे”, असं मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

“मी तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून जीव वाचवला, पण भाऊ खाली आलाच नाही”

दरम्यान, भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवतील, अशी माहितीदेखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:47 pm

Web Title: bjp leader chandrakant patil slams uddhav thackeray mva government over vanvasi people forest backwards in pune vjb 91
Next Stories
1 मुंबईची हवा दिल्लीप्रमाणे अतिवाईट
2 एक शून्य शून्य आता ‘शून्य’!
3 पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार
Just Now!
X