लग्न जमत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.सायंकाळी उशिरा घटना उघडकीस आली असून रंजन गणपत भोपळे आणि शैला गणपत भोपळे अस आत्महत्या केलेल्या बहीण भावाचे नाव आहे.याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खेड तालुक्यातील डेणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध घेऊन बहीण आणि भावाने आत्महत्या केली आहे.मयत रंजन गणपत भोपळे वय-४० आणि शैला गणपत भोपळे वय-३८ रा.दोघे ही डेणेगाव ता.खेड,जि.पुणे दोघे ही एकत्र राहातात त्यांच्या आईवडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले आहे.रंजन चा विवाह झाला असून त्याचा पत्नीसोबत काडीमोड झाला आहे.त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहते.रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहिण देखील अविवाहित असून विवाह जुळत नव्हता.याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे,शैलाचे वय देखील वाढत चालले होते.

दुपार पासून घर बंद असल्याने त्यांची चुलत बहीण पाहण्यासाठी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.शैलाची हालचाल सुरू होती तिला ग्रामस्थांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचा अधिकचा तपास खेड पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brother sister suicide due to depression in marriage
First published on: 18-10-2018 at 05:49 IST