22 April 2019

News Flash

दापोली पिंपरी चिंचवड बसला महाडमध्ये अपघात, २५ प्रवासी जखमी

चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

दापोली पिंपरी चिंचवड बसला महाडच्या रेवतले तालुक्यात अपघात झाला आहे. आज सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळते आहे. MH14 BT 3384 असा या बसचा क्रमांक आहे. या बसमध्ये ५० प्रवासी बसले होते ज्यापैकी २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तीव्र उतार आणि वळणावर चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले, त्यामुळे ही बस एका बाजूला उलटली आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड विभागाचे व्यवस्थापक कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत अभियंता वाघाटे आणि अमित माळी यांचीही उपस्थिती होती. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेत वाहन चालक सुखरुप आहे अशी माहिती मिळाली आहे. तसेच गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले असेही समजते आहे. पिंपरी चिंचवडच्या वल्लभ नगर आगारातून शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही बस निघाली होती. ही बस मुरुड या ठिकाणी मुक्कामी गेली होती. मुरुडहून सकाळी ८.३० च्या सुमारास ही बस पिंपरी चिंचवडकडे निघाली होती. त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

First Published on February 9, 2019 5:16 pm

Web Title: bus accident in mahad of murud mahad bus 20 people injured