23 November 2017

News Flash

मांजरींची काळजी न घेणाऱ्या दोन महिलांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरातील दोन महिलांवर मांजरींची योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात

पुणे | Updated: September 12, 2017 4:54 PM

पोलिसांनी घरातून २५ मांजरी ताब्यात घेतल्या. (प्रातिनिधीक छायाचित्र)

पुण्यातील कोंढवा परिसरातील दोन महिलांवर मांजरींची योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ब्रह्मा होरिझन या सोसायटीमध्ये दीपिका कपूर आणि संगीता कपूर या दोन महिला राहतात. त्यांच्या घरात २० ते २५ मांजरी आहेत. मात्र, त्यांची योग्य ती निगा राखली जात नव्हती. अत्यंत घाणेरड्या वातावरणात या मांजरींना जगावं लागत होतं. अखेर शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी घरातून २५ मांजरी ताब्यात घेतल्या. या मांजरींना आता प्राणीप्रेमींकडे सोपवण्यात आले आहे. तसेच दीपिका आणि संगीता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शेजाऱ्यांच्या मांजरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर वंदना चव्हाणांनी मांजरांच्या मालकांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

First Published on September 12, 2017 4:54 pm

Web Title: case against two women who did not take care of cats in pune