डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सचिन आंदुरे याला आज दुपारी विठ्ठल रामजी पुलावर दाभोलकराची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. याच पुलावर जात ठिकाणी सीबीआय च्या पथकाने आंदुरे सोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाचा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांकडे एकाच वेळी तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी मान्य करत न्यायालयाने त्याला १ सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. एस सय्यद यांनी हा आदेश दिला.तर आज सीबीआय ने दुपारी पावणे तीन च्या सुमारास सचिन आंदुरे याला डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली होती.त्या ठिकाणी घेऊन जाऊन पाहणी करण्यात आली. तर गौरी लंकेश खून प्रकरणातील तिघांना दाभोलकर हत्या प्रकरणात आज न्यायालयात हजर करणार असे सी बी आय वकिलांनी काल न्यायालयात सांगितले होते. परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांना आज हजर न करता उद्या हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआय च्या सरकारी वकिलांनी दिली आहे. पुलावर पाहणी करून झाल्यावर सचिन अंदुरेला घेऊन सीबीआयचे अधिकारी पर्वती येथील सुधन्वा गोंधळेकरच्या घरीही घेऊन गेले होते.