आरोग्य सुविधांची कमतरता असणाऱ्या भागांतील डॉक्टर आता शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांशी ‘टेलिमेडिसिन’ तंत्रज्ञानाद्वारे संपर्क साधून त्यांचे ‘एक्सपर्ट ओपिनिअन’ घेऊ शकणार आहेत.
‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड काँप्युटिंग’च्या (सी- डॅक) ‘मेडिकल इन्फॉर्मेटिक्स ग्रुप’ने ‘मक्र्युरी निंबस सूट’ ही टेलिमेडिसिन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे खेडय़ातील डॉक्टरांना रुग्णांचे वैद्यकीय अहवाल इतर ठिकाणच्या वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवून त्यांच्याशी चर्चा करणे शक्य होणार आहे. लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवरूनही ही प्रणाली वापरता येईल.  
 ‘विंडोज अझुरे’ या क्लाऊड सव्र्हिसवर जाऊन त्यावर मक्र्युरी निंबससाठी नोंदणी केल्यावर ही टेलिमेडिसिन प्रणाली वापरता येणार आहे. यासाठी स्वतंत्र मशीन किंवा सव्र्हर घेण्याची गरज भासणार नाही. सीडॅकचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी प्रफुल्ल कोलते म्हणाले, ‘‘ज्या भागात वैद्यकीय चाचण्यांचे विश्लेषण करून अहवाल देण्यासाठी रेडिओलॉजिस्टसारख्या तज्ज्ञांची उपलब्धता नसेल अशा भागातील डॉक्टरांना इतर ठिकाणच्या रेडिओलॉजिस्टशी या प्रणालीद्वारे संपर्क साधता येईल. या प्रणालीवर थेट संपर्कासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सोय आहे.’’ डॉक्टरांच्या गरजेनुसार या प्रणालीची वेगवेगळी पॅकेजेस विंडोज अझुरेवर मिळू शकणार आहेत.