28 October 2020

News Flash

भुयारी मेट्रो मार्गिके तील आव्हानात्मक टप्पा पूर्ण

मेट्रो नियोजित वेळेत धावावी, यासाठी महामेट्रोकडून वेगात कामे सुरू आहेत.

भुयारी मेट्रोचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण झाल्यानंतर अधिकारी वर्गाकडून बोगद्यामध्ये तिरंगा फडकावून जल्लोष करण्यात आला.

पुणे : पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिके अंतर्गत शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गातील आव्हानात्मक टप्पा सोमवारी पूर्ण झाला. शेतकी महाविद्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.  टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) द्वारे १० महिन्यात १ हजार ६०० मीटरच्या बोगद्याचे काम महामेट्रोकडून करण्यात आले आहे. आता नदीपात्राखालून बोगद्यासाठी खोदाईचा टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिके मध्ये ५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा भुयारी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ झाला. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी प्रस्तावित स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा (शाफ्ट) करून त्याखाली बांधकाम करण्यात येते. भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने सुरू आहे. त्यासाठी चीन येथून ही यंत्रे आणण्यात आली आहेत. शेतकी महाविद्यालयापासून भुयारी मार्गाचा बोगदा करण्यास सुरुवात झाली आणि सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयापर्यंतचे काम पूर्ण झाले. मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, टाटा प्रोजेक्ट कं पनीचे राजेश जैन आणि बेनी जोसेफ, मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘मेट्रोच्या कामाचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. मेट्रो नियोजित वेळेत धावावी, यासाठी महामेट्रोकडून वेगात कामे सुरू आहेत. सुरक्षा नियमांना अधिन राहून गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येत आहेत,’ अशी प्रतिक्रिया महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 1:50 am

Web Title: challenging work of underground metro in pune completed zws 70
Next Stories
1 पिसोळीत निवासी भागात बेकायदा गोदामे
2 तंत्रज्ञ भरतीच्या नावाखाली उधळपट्टी
3 भाज्या कडाडल्या
Just Now!
X