06 August 2020

News Flash

एमपीएससीच्या अभ्यासक्रमात बदल

सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळाव

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सहा विषयांपैकी चार विषयांतील घटकांमध्ये बदल केला आहे. सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आल्याचे एमपीएससीने घोषणापत्राद्वारे जाहीर केले आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण सहा विषय असतात. त्यातील सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ आणि सामान्य अध्ययन ४ असे चार विषय असतात. या चार विषयांतील काही घटकांमध्ये बदल करण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रम घोषणापत्र प्रसिद्ध झालेल्या दिनाकांपासून पुढील परीक्षांसाठी लागू असेल, असे आयोगाने स्षष्ट केले आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील सुधारित अभ्यासक्रम संके तस्थळावर देण्यात आला असून, इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत समजण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:15 am

Web Title: changes in the syllabus of mpsc abn 97
Next Stories
1 कोकणसह घाटमाथा परिसरात पाऊस
2 चिंताजनक : पुण्यात एकाच दिवसात ९०३ रुग्ण आढळले, तर १४ रुग्णांचा मृत्यू
3 पुरंदर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या १८६
Just Now!
X