राज्यातील ३२५२ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. त्यामध्ये नगर, औरंगाबाद, बीड, परभणी आणि गडचिरोली या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह विविध कार्यकारी सोसायटय़ांचा समावेश आहे. यापैकी ११ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश २ फेब्रुवारीला दिले आहेत. चार टप्प्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३२५२ संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.