विद्यार्थ्यांकडून संकेतस्थळाची निर्मिती

पुणे : ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके  उपलब्ध करून देण्यासाठी खास संके तस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके  घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना आता या संके तस्थळामुळे आवश्यक पुस्तके  एका क्लिकवर मिळू शकणार आहेत.

पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार टाळेबंदीमुळे आपापल्या गावी गेले. मात्र गावी राहून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके  उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील उमेदवारांची गरज लक्षात घेऊन महेश बडे आणि किरण निंभोरे या तरुणांनी पुढाकार घेऊन http://www.abcbook.in या संके तस्थळाची निर्मिती के ली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, के ंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिं ग आणि स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांची पुस्तके  उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

संके तस्थळाविषयी महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी माहिती दिली. ‘ग्रामीण भागातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. तर काही उमेदवार त्यांच्या गावी राहून अभ्यास करतात. मात्र जिल्ह्य़ाच्या-तालुक्याच्या ठिकाणी त्यांना हवी असलेली पुस्तके  उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पुस्तके  न मिळाल्यास उमेदवारांचा अभ्यास होत नाही. काही उमेदवार के वळ पुस्तके  घेण्यासाठी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात येतात. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी संके तस्थळ निर्माण के ले. या संके तस्थळाद्वारे राज्यात कु ठेही पुस्तके  सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील. जेणेकरून उमेदवारांना खर्च करून के वळ पुस्तकांसाठी पुण्यात यावे लागणार नाही. सुरुवातीला पुस्तके  पोहोचवण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही,’असे त्यांनी सांगितले.