मुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या अग्नितांडवामुळे १४ निष्पाप लोकांचा जीव घेला. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ४३ अनधिकृत हॉटेल्स आणि टेरेस हॉटेल्सवर हातोडा चालवला. ही बांधकामे अनधिकृत असल्याने जमीनदोस्त करण्यात आली. मुंबईतील १ अबव्ह आणि मोजोस ब्रिस्ट्रो या दोन हॉटेल्सना लागेल्या आगीमुळे १४ जणांचा जीव गेला. या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी ही कारवाई केली.

कोरेगाव पार्क आणि परिसरातील २७ तर पाषाण परिसरातील १६ हॉटेल्सवर कारवाईचा बडगा चालवण्यात आला. बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली हॉटेल्स आणि बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये कोंढवा, औंध, पाषाण, बावधन, खराडी या भागातील हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यापुढच्या काळातही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.