08 July 2020

News Flash

पुण्यात माकडांवर होणार करोना लसीची चाचणी

वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

देशात आणि राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दरम्यान करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडं राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल. यासाठी तात्काळ माकडे उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे रोजीच्या पत्रान्वये शासनाला मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडं तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.

अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणं, त्यांना सुरक्षितपणे बाळगणं, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा, तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणं आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 7:53 pm

Web Title: corona vaccine should be tested on monkeys pune minister sanjay rathod jud 87
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पोलीस मित्र’लाच पोलिसांकडून बेदम मारहाण
2 राज्यातील पहिली घटना: विद्यार्थीनीकडे घरभाडे मागणं महिलेच्या आलं अंगलट; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
3 टेमघर धरणाच्या दुरुस्तीत खंड
Just Now!
X