26 September 2020

News Flash

पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल विक्री बंद; अत्यावश्यक सेवांना वगळले

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले तातडीनं आदेश

संग्रहित छायाचित्र

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असताना रस्त्यावरील रहदारी सुरूच असल्याचं चित्र आहे. अनेक जण रस्त्यावर गाड्या घेऊन फिरत असल्याचं त्याचबरोबर पेट्रोल पंपवर गर्दी होत असल्याचं दिसून आल्यानं पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर करोनाचा झपाट्यानं प्रसार झाला. पिंपरी-चिंचवड शहरातही करोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली. पुण्यानंतर राज्यातील इतर भागात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारनं साथरोग प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला. त्याचबरोबर गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत आहेत.

करोनाचा संसर्ग थांबवण्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले आहे.

यांना वगळले पण…

अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी.
करोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.
अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती.
वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.
विशेष म्हणजे या चारही प्रकारच्या व्यक्तींनी पेट्रोल भरताना एकदाच गाडीची टाकी पूर्ण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 5:56 pm

Web Title: coronavirus in pune petrol selling banned in pune district after outbreak of coronavirus bmh 90
Next Stories
1 पुणे: करोनाची टेस्टिंग करणाऱ्या एका स्वदेशी किटची किंमत ८० हजार
2 पुण्यात अंगणवाडी सेविकेच्या पतीला करोनाची लागण; हॉटेल मॅनेजर म्हणून आहे कामाला
3 शंभर टक्के संचारबंदी, रस्त्यावर सायकल खेळायलाही नाही संधी
Just Now!
X