News Flash

पुण्यात प्रेमी युगूलाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

मुलाचे लग्न ठरल्यामुळे या जोडप्याने नैराश्यातून आत्महत्या केली.

पुण्यात शनिवारी पहाटे प्रेमी युगूलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. हे दोघेजण हडपसरनजीक असणाऱ्या शिंदे वस्तीमध्ये राहणारे असल्याची पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तरुण २१ वर्षांचा असून तरुणी १८ वर्षांची आहे. दोघेजण रात्री १०.३० वाजता घरातून बाहेर पडले होते. ज्यानंतर घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. शनिवारी पहाटे ३ वाजता दोघांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. ३.३० वाजता दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ससाणे रोड रामनगरजवळील रेल्वे रुळांवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक गाडीखाली त्यांनी उडी मारली.
सध्या या दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोघांकडे अद्याप कोणतीही चिठ्ठी सापडली नसून पोलिस पालकांकडे तपास करत आहेत. मुलाचे लग्न ठरल्यामुळे या जोडप्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 12:12 pm

Web Title: couple suicide on railway track in pune
टॅग : Love,Relationship
Next Stories
1 आनंद यादव आणि प्रकाशकांना सुनावलेली शिक्षा कायम
2 शनिवारची मुलाखत ‘पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ त समावेश व्हायला हवा होता’
3 ‘नीट’च्या तयारीची पुस्तके घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
Just Now!
X