भवानी पेठेत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नेहरू रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

सागर सुभाष गायकवाड (वय २३, रा. राजीव गांधी कॉम्प्लेक्स, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अल्ताफ उस्मान शेख (वय २१) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी शेख याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. पोलिसांनी गायकवाड याच्या साथीदारांना पकडले. मात्र, गायकवाड पोलिसांना गुंगारा देत होता. मंगळवारी तो नेहरू रस्त्यावर डायस प्लॉट परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अमोल पवार यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच तो पळाला. पाठलाग करून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, हवालदार शैलेश जगताप, अजय थोरात, संतोष मते आणि अमोल पवार यांनी ही कारवाई केली.