News Flash

संचारबंदी, निर्बंधांचा टेमघर धरण दुरुस्तीला फटका

कामगार, बांधकाम साहित्याच्या कमतरतेमुळे यंदा काम नाही

कामगार, बांधकाम साहित्याच्या कमतरतेमुळे यंदा काम नाही

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीला करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका बसला आहे. कामगार आणि बांधकाम साहित्याची वानवा असल्याने यंदा दुरुस्तीची कामेच होऊ न शकल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने धरण दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद के ली असून या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करणे, तर दीर्घ कालावधीच्या कामांचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम २००० मध्ये सुरू होऊन २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा या ठिकाणी करण्यात येत होता. सन २०१७ मध्ये धरणातून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफू ट (टीएमसी) आहे. धरण बांधणीसाठी २५२ कोटी रुपये खर्च आला होता. गळती रोखण्यासाठी के ंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस) तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी करण्यात येत आहे. धरणाची गळती ९० टक्के  रोखल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत असला, तरी दीर्घकालीन कामे करणे आवश्यक आहे. दरम्यान, धरणाच्या वरील बाजूची कामे झाली असून खालच्या बाजूची कामे बाकी आहेत. त्याकरिता २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यानुसार मार्च महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात दुरुस्तीच्या कामांसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करणे, तसेच सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस या संस्थेला काही निधी देऊन दीर्घ कालावधीची कामे, धरण मजबुतीकरण यांबाबत विविध चाचण्या व छाननी करणे ही कामे करण्यात येणार होती, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

नेमकी समस्या काय?

फे ब्रुवारीअखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच करोना संसर्गाची दुसरी लाट आली. या काळात रुग्णसंख्या वाढत असल्याने कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत के ले. जलसंपदा विभागाकडून काही कामगारांना कामाची हमी देऊन थांबवण्यात आले होते. मात्र, धरण दुरुस्तीसाठी आवश्यक कच्चा माल आणि इतर आवश्यक बांधकाम साहित्य येऊ शकले नाही. परिणामी यंदा पावसाळ्याआधी करण्यात येणारी नियोजित कामे होऊ शकलेली नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:53 am

Web Title: curfew restrictions hit temghar dam repair zws 70
Next Stories
1 लोकजागर : मारा डल्ला!
2 १७० पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा प्रस्ताव
3 बारावीच्या परीक्षेवरच सीईटीचे भवितव्य
Just Now!
X