गतवर्षीच्या तुलनेत मागणी कमी; दरात घट

पुणे : सीताफळ आणि रामफळाच्या जातकुळीतील  फळ असलेल्या हनुमाळ फळाचा हंगाम यंदा लवकर सुरू झाला आहे. हनुमान फळ थंड असल्याने त्याला फारशी मागणी नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत हनुमान  फळाला ३० टक्के कमी दर मिळत आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

यंदाच्या वर्षी करोना संसर्गामुळे सर्वाधिक फटका सीताफळांना बसला. सीताफळाप्रमाणे हनुमान फळ थंड आहे. गतवर्षी प्रतवारीनुसार एक किलो हनुमान फळाला ४० ते १०० रुपये असा दर मिळाला होता. यंदा हनुमान फळाला २० ते ७० रुपये असा दर मिळत आहेत. यंदा हनुमान फळाला मागणी कमी असून दरात घट झाली असल्याची माहिती फळ बाजारातील व्यापारी माउली आंबेकर यांनी दिली.

दरवर्षी हनुमान फळांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. यंदा वीस दिवस आधीच हंगाम सुरू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात हनुमान फळाची आवक सुरू झाली आहे. फळ बाजारात सध्या नगर जिल्ह्य़ातून दररोज तीन ते चार टन हनुमान फळाची आवक होत आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी तसेच बीड जिल्ह्य़ातून हनुमान फळाची आवक होत आहे. गुजरात आणि हैद्राबाद येथून हनुमान फळाला मागणी असल्याचे फळ व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

हनुमान फळ हे रामफळ, सीताफळाच्या जातकुळीतील आहे. हनुमान फळाचा आकार ओबड-धोबड असतो. चवीला गोड असलेल्या या फळाचा गर आइस्क्रीमप्रमाणे खाता येतो. सीताफळापेक्षा हनुमान फळात बिया कमी असतात. एका हनुमान फळाचे वजन दहा ग्रॅमपासून एक किलोपर्यंत असते.

– माउली आंबेकर, फळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड