News Flash

दगडूशेठ हलवाई गणपतीचं मुख्य मंदिरातच होणार विसर्जन; ट्रस्टचा स्तुत्य निर्णय

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांची माहिती

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मुख्य मंदिरातच विसर्जन करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही माहिती दिली. तसेच शहरातील इतर मंडळांनी देखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाच्या ठिकाणीच बापाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अशोक गोडसे म्हणाले, “देशभरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्या पुण्यात देखील दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी रस्त्यावर येता कामा नये, हे लक्षात घेता मंडळाने भाविकांना ऑनलाइन दर्शन देण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन दर्शनास भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मंडळाने आणखी एक वेगळे पाऊल उचलले असून मंदिरातच बाप्पाच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शहरातील सर्व मंडळानी देखील मंडप परिसरात विसर्जन करावे तसेच पुणेकरांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तींचे देखील घरातच विसर्जन करावे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 8:06 pm

Web Title: dagdusheth halwai ganpati will be immersed in the main temple welcome decision of the trust aau 85 svk 88
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड: लॉकडाउनमुळे जवळ पैसा नसल्यानं छापल्या ६ लाखांच्या बनावट नोटा; टोळी जेरबंद
2 पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदवार्ता, जवळपास वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
3 VIDEO: शारदेसह विराजमान भारतातील एकमेव गणपती
Just Now!
X