News Flash

करोना काळात दुधाला फटका

रोजच्या दुधाच्या विक्रीत २० ते ३० टक्के  घट

संग्रहित छायाचित्र

रोजच्या दुधाच्या विक्रीत २० ते ३० टक्के  घट

पुणे : करोना काळात राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठय़ा प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के  घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी लागू के ली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र हॉटेलांवर क्षमतेच्या ५० टक्के  ग्राहकांनाच प्रवेश असे काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली. त्यात हॉटेल बंद ठेवून के वळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. या सगळ्याचा फटका दैनंदिन दूध विक्रीवर झाला आहे. दुधाच्या संकलनाचे प्रमाण कायम आहे, दुधाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने दुधाच्या वितरणावर काही परिणाम झालेला नाही. मात्र, विक्री घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले, की राज्यात दुधाच्या विक्रीत घट झाली आहे. गोकुळचे रोजचे दुधाचे संकलन १२ लाख लीटर आहे. त्यापैकी सुमारे दीड लाख लीटर दूध शिल्लक राहते. हॉटेल, चहाची दुकाने,आइसक्रीम उत्पादक हे दूध खरेदी करणारे प्रमुख उद्योग करोनामुळे अनियमित पद्धतीने सुरू आहेत.

किरकोळ विक्रीची दुकाने के वळ ७ ते ११ या वेळेतच सुरू असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांकडून येणारी मागणी बंद झाली. शिवाय हॉटेल, कं पन्यांची उपाहारगृहे, रस्त्यावरील चहाची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे एकू ण २० ते ३० टक्के  विक्री कमी झाली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर दूध विक्री विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर-फे ब्रुवारी या दरम्यान दुधाची मागणी पूर्ववत झाली. मात्र आता मार्चपासून पुन्हा दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुधाची विक्री जवळपास ३० टक्के  कमी झाली आहे. 

– श्रीपाद चितळे, भागीदार, चितळे डेअरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:06 am

Web Title: daily milk sales fall by 20 to 30 percent due to coronavirus zws 70
Next Stories
1 पुन्हा खासगी कंपन्यांद्वारेच शासकीय पदांची भरती प्रक्रिया
2 कलावंतांचे जगणे झाले अवघड
3 मेट्रोच्या खोदाईमुळे पीएमपीची दूरध्वनी सेवा खंडित
Just Now!
X