पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीट मधील ६०० पेक्षा अधिक दुकांनाना दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत सर्व दुकाने जळून खाक झाली होती. यामुळे अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त दुकानदारांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या.

या पाहणी दौऱ्याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आगीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी काही सूचना देखील केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा भाग कॅन्टोन्मेंटमध्ये येत असल्याने तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार आहोत.

पुणे : फॅशन स्ट्रीट मार्केटची राखरांगोळी; साडेतीन तासांत ४४८ दुकानांचा कोळसा

पुण्यातील नेहमी गजबलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी रोडवरील फॅशन स्ट्रीट मार्केटला  शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती.  आगीच्या लोळांनी कापडाची दुकानं व गोदामानं वेढा घातला होता. साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात जवळपास पाचशे  दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळीच झाली होती.