22 October 2020

News Flash

‘सहज बोलता बोलता’मध्ये दिलीप प्रभावळकर

आज मनमुराद गप्पांची मैफल

आज मनमुराद गप्पांची मैफल

पुणे : रंगभूमी आणि चित्रपटांतील विविध भूमिकांतून प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे, गप्पा मारल्यासारखे सहज लेखन करणारे ज्येष्ठ अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर यांच्याशी सहज -मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ‘लोकसत्ता’च्या नव्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात आज सायंकाळी सहा वाजता हा वेब-संवाद रंगणार आहे.

जवळपास पाच दशकांच्या त्यांच्या कारकीर्दीत बालनाटय़े, व्यावसायिक रंगभूमीवरील नाटके , दूरदर्शन मालिका, मराठी-हिंदी चित्रपटातील विनोदी, खलनायकी, चरित्र भूमिका असा अभिनयाचा मोठा पट आहे. तर लहान मुलांसाठीच्या लेखनापासून हलकं फु लकं  निखळ साहित्यही त्यांनी लिहिले आहे. अशा या बहुढंगी व्यक्तिमत्त्वाकडे अनुभवाची, किश्शांची मोठी शिदोरी आहे. त्यांच्या आजवरच्या प्रवासासह अनेक वेगवेगळ्या विषयांवर नाटककार-लेखक शेखर ढवळीकर संवाद साधणार असून, वाचकांनाही यात सहभागी होता येईल.

सहभागी होण्यासाठी..

http://tiny.cc/LS-SahajBoltaBolta-22May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे आज सायंकाळी सहा वाजता या वेबसंवादात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी http://www.loksatta.com या संके तस्थळाला भेट द्या.

* या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:09 am

Web Title: dilip prabhavalkar in loksatta sahaj bolta bolta event zws 70
Next Stories
1 सोहळा नाही, केवळ पादुकांची वारी!
2 आधी लढाई करोनाशी..
3 लघुउद्योग, व्यावसायिकांना तीन महिने मिळकतकरात माफी
Just Now!
X