पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत जिल्हा प्रशासनाची स्पष्टोक्ती

पुणे : पुण्याच्या हक्काच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलता येणार नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हा आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कं पनी (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कं पनी – एमएडीसी) प्रशासनाने के ली. विमानतळाच्या जागेत बदल करण्याबाबत अद्यापही लेखी तक्रार प्राप्त झालेली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट के ले.

विमानतळ प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नसल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एएआय) स्पष्ट करण्यात आले आहे. के ंद्र, राज्य शासनाचे विविध विभाग, संरक्षण मंत्रालय, हवाई दल, नागरी हवाई वाहतूक संचालनालय अशा सर्वानी प्रकल्पाला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता जागेत बदल करणे अशक्य आहे. त्यातून जागा बदलायचा निर्णय झालाच, तर पुन्हा पहिल्यापासून सर्व प्रक्रिया करावी लागेल. परिणामी प्रकल्पाची जागा बदलता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासन आणि एमएडीसीमधील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, जिल्ह्य़ात पुरंदर सोडून इतर कोणतीही जागा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एएआय) दिला आहे. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील निवडलेल्या सात गावांमधीलच जागा योग्य आहे, असे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट के ले होते.

याशिवाय पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत बदल के ला जाणार नसल्याची ग्वाही चालू वर्षी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तसेच प्रकल्पाच्या जागेला ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर के ले होते.

तांत्रिकदृष्टय़ाही विमानतळाची जागा बदलणे अशक्य

लोहगाव येथील आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) एक छोटी अशा दोन धावपट्टय़ा आहेत. पुरंदर विमानतळाचे हवाई क्षेत्र सामाईक होईल किं वा बाधित होईल, असा आक्षेप हवाई दलाकडून घेण्यात आला होता. त्यावर पुरंदरहून होणाऱ्या उड्डाणांची उंची कमी ठेवणे, तसेच मुंबई-हैदराबाद, मुंबई-बेंगळुरू यांचे हवाई क्षेत्र बाधित होऊ नये म्हणून मार्गाची फे रआखणी करण्याचे ठरले आहे. लोहगाव आणि पुरंदर विमानतळांमध्ये सामंजस्य, समन्वय असण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (एअर ट्रॅफिक कण्ट्रोल – एटीसी) असणे आवश्यक असून हा कक्ष पुरंदर विमानतळ क्षेत्रात न ठेवता लोहगाव येथेच ठेवण्यावर एकमत झाले आहे. याशिवाय के ंद्र, राज्य सरकारच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून के वळ परताव्यांचे पर्याय निश्चितीकरण बाकी आहे. या पार्श्वभूमीवर तांत्रिकदृष्टय़ाही विमानतळाची जागा बदलणे अशक्य आहे.