प्रत्येकाला इतरांप्रमाणे आयुष्य जगण्यास मिळेल असे नसते. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. यासाठा प्रत्येकजण धडपड करत असतो. याच पार्श्वभूमावर जन्मतः दिव्यांग असलेल्या पुण्यातील चिन्मय चंद्रशेखर मोकाशी याने इयत्ता बारावीला 74. 64 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. आता त्याचं बँकीग क्षेत्रात करिअर करायचं स्वप्नं असल्याचे त्यांने सांगितले आहे.

या यशाबद्दल चिन्मय मोकाशी याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाले की, मी लहानपणापासुन दिव्यांग असल्याने, मला इतरासारख बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र मला शिक्षणाची आवड होती. ते लक्षात घेऊन आई,बाबांनी मला सिंहगड रोडवरील एका शाळेत प्रवेश घेऊन दिला. मात्र पुढे काही अडचणींमुळे मी  इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. मला बारावीत चांगले गुण मिळाल्याने, आता मला बँकीग क्षेत्रात करिअर करायच असल्याचे त्यांनी सांगितले.

चिन्मय लहान पणापासून दिव्यांग असल्याने चिन्मयला एकट्याने शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याचे आई-बाबाच त्याला शाळेत नेत असत व घेऊन येत करत असत. त्याने इयत्ता आठवी पासून बारावीपर्यंत नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याची रात्र शाळा 6 ते 10 वेळेत असायची. त्यामुळे त्याची आई सकाळी 10 ते  सायंकाळी 5.30 या वेळेत ड्युटी करून आल्यावर, त्याला सायंकाली 6 वाजता शाळेत घेऊन जायची. तर कधी बाबा देखील, त्याच्या सोबत असायचे, आज पर्यंत त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात त्याच्या आई-बाबांचा मोलाचा वाटा आहे.