29 September 2020

News Flash

चमकोगिरीसाठी येत असाल तर येऊ नका, पुणेकरांनी गिरीष महाजनांवर काढला राग

नागरिकांचा वाढता रोष पाहून गिरीश महाजन यांनी दांडेकर पुलाजवळ आलेल्या वस्तीतून काढता पाय घेतला

पेपरमध्ये फोटो येणार म्हणून मदत करायला आला असाल तर येऊच नका, आम्हाला कायम स्वरूपी अशी ठोस मदत करा असं म्हणत पुण्यातील दांडेकर पूल भागातील नागरिकांनी आपला संताप आणि रोष व्यक्त केला. पुण्यातील दांडेकर पूल भागात मुठा कालव्याला भगदाड पडल्याने चारशेहून जास्त कुटुंबांचे संसार पाण्यात वाहून गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले होते त्यांनाच येथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत. नागरिकांचा वाढता रोष पाहून गिरीश महाजन यांनी तिथून काढता पाय घेतला.

गुरुवारी ही घटना घडली तेव्हापासून नेते मंडळी केवळ पाहून जात आहेत.आम्हाला कायम स्वरूप मदत होईल.अशा स्वरूपाची मदत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.केवळ उद्या पेपरमध्ये तुमचे फोटो येणार असतील तर येऊ नका अशा शब्दात गिरीश महाजनांसमोर रोष व्यक्त केला.
त्यावर महाजन म्हणाले की,सरकारकडून सर्वाना मदत केली जाईल.सरकारच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही.याची काळजी घेतली जाणार आहे.त्या स्वरूपाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यानी सांगितले.मात्र नागरिक त्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.समोरील नागरिकांचा रोष पाहता. त्यांनी घटनास्थळापासून निघणेच पसंत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 4:50 pm

Web Title: do not come here for paper headlines and photos mutha river canal burst survivors to girish mahajan
Next Stories
1 खंडाळा घाटात कार कोसळून एकजण ठार, तिघे आश्चर्यकारकरित्या बचावले
2 उंदीर, घुशी व खेकड्यांनी पोखरला मुठा कालवा: गिरीश महाजनांचा अंदाज
3 उद्धव ठाकरेंची पुणे कालवा दुर्घटनेतील महिलेला दीड लाखांची मदत, ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल
Just Now!
X