एमके सीएल नॉलेज फाउंडेशनतर्फे  ‘टिलीमिली’ मालिके तून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रातील सर्व विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सह्य़ाद्री वाहिनीवर ८ फे ब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत ही मालिका दाखवली जाणार असून, दुसऱ्या सत्रातील पाठांचा मालिके त समावेश असल्याची माहिती एमके सीएल नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी दिली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद ठेवून ऑनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले. मात्र ऑनलाइन शिक्षणाची साधने नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एमके सीएल नॉलेज फाउंडेशनने जुलैमध्ये टिलीमिली ही मालिका सुरू केली.

राज्यभरात शहरांतील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील, आदिवासी पाडय़ांतील विद्यार्थ्यांनी, शिक्षक, पालकांनी या मालिके चा लाभ घेतला होता. आता करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले आहेत. मात्र पहिली ते चौथीच्या शाळा प्रत्यक्ष कधी सुरू होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना टिलीमिली मालिकेद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टिलीमिली मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते चौथीच्या पाठय़पुस्तकांतील दुसऱ्या सत्रासाठीचे पाठ, संकल्पनांवर आधारित आहे. कृतीयुक्त शिक्षणाची पद्धत या मालिकेत वापरण्यात आली आहे. त्यामुळे

या मालिकेत रोज सुचवण्यात आलेले उपक्रम विद्यार्थ्यांना पालकांसह किं वा त्यांच्या परिसरात करून पाहता येतील.

मालिका प्रामुख्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी असली, तरी मराठी समजणाऱ्या आणि अमराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त ठरेल, असे सावंत यांनी सांगितले.

वेळ            इयत्ता

सकाळी ७.३० ते ८.३० –   चौथी

सकाळी ९ ते १०.००      –   तिसरी

सकाळी १० ते ११.००    –  दुसरी

सकाळी ११.३० १२.३०  – पहिली