पुणे : देशातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांच्या खासगीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने एल्गार पुकारला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या प्रतिरक्षा मजदूर संघातर्फे शुक्रवारपासून (१८ जून) देशभर निदर्शने करण्यात येणार आहेत.
आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी मंजुरी दिली. त्या पाश्र्वाभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नेशन डिफेन्स वर्कर्स फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तीन संघटना एकत्र आल्या आहेत.