देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर, केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले.
यावेळी त्यांनी समाजासमोर पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जाते, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाणार केला जाणार असल्याचेही म्हटले. याचबरोबर पुण्यात देशातील पोलीस महासंचालकांची परिषद यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये आयसर येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय पोलिस महासंचालक परिषदेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या परिषदेनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन. रेड्डी यांनी पोलीस संशोधन केंद्र येथील हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2019 6:53 pm