News Flash

पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून

रात्री कार्यालयाजवळ उभा असतानाच झाला प्राणघातक हल्ला

दिपक मारटकर

पुण्यातील बुधवार पेठ भागातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिपक मारटकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा दिपक त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शुक्रवार पेठेतील गवळी आळी येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दिपकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

जखमी अवस्थेतच दिपकला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा हल्ला का करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. हल्लेखोराचा शोध परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे, अशी माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. दिपक हा युवा सेनेचा पदाधिकारी देखील होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 10:11 am

Web Title: ex shivsena corporator son murdered in pune shukrawar peth scsg 91 svk 88
Next Stories
1 हाथरस प्रकरणावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया…
2 हॉटेल सुरू करण्यामध्ये मनुष्यबळाची अडचण
3 विकासकामांसाठीनिधीची चणचण
Just Now!
X