राज्यात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर
पुणे : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घालण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख पदविका प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता संस्थेतर्फे  घेण्यात आलेल्या नवउद्यमी मेळाव्यातून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेची महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी लेजिटडॉक या नवउद्यमीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टा, सिंगापूर आणि बहारीन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. आता राज्यातील  सुमारे दहा लाख पदविका प्रमाणपत्रे बनावटीपासून मुक्त होऊन ऑनलाइन पडताळणीसाठी उपलब्ध होतील. पदविका प्रमाणपत्रे डिजिटल झाल्याने उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होईल, तसेच उमेदवारांसाठीही ही सुविधा सोयीची ठरेल, अशी माहिती कौशल्य विकास मंडळाने दिली.

ब्लॉकचेन म्हणजे…

या प्रणालीद्वारे उपलब्ध झालेल्या डिजिटल कागदपत्रांची १० सेकंदात जगभरातून कु ठूनही ऑनलाइन पडताळणी करणे शक्य आहे.  या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीसाठी मंडळाच्या मनुष्यबळाची आणि वेळेचीही बचत होईल.

३०१ व्यवसाय अभ्यासक्रम

शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी, विशेष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम चालवण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध २८ गटातील शैक्षणिक पात्रतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे १५६, एक वर्ष कालावधीचे १०० आणि दोन वर्षे कालावधीचे ४५, अर्धवेळाचे २३४, तर पूर्णवेळ कालावधीचे ६७ असे एकूण ३०१ अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या एक हजार २६९ संस्थांमध्ये राबवण्यात येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात.